आजोबांचा मोबाईल फोन

एका सत्तरीच्या पुढच्या आजोबांचा मोबाईल फोन अचानकच माझ्या हातात पडला!!
बरेचसे व्हाट्स ऍप मेसेजेस मित्र नातेवाईकांचेच होते!
एक गृप मात्र विचित्र नांवाचा होता!
त्या गृपचे नांव होते “विसपागे चा गृप”!!
त्या गृपवर भन्नाट अश्लील मेसेजेस फोटो क्लिप्स ची मोठी रेलचेल होती, मला धक्काच बसला!!
मी मेंबर्स कोण कोण आहेत बघू लागलो!
त्यात पागे नावाचा कुणीच नव्हता आणि वि पासून नांव सुरु होणाराही कुणीच नव्हता!!
पण गंमत म्हणजे तो स्त्री पुरुषांचा एकत्र गृप होता!!
मी अजून काही “दिसतयं”का ते बघू लागलो तेवढ्यात आजोबा आतून बाहेर आले आणि झडप घालून मोबाईल माझ्याकडून काढून घेतला!!
माझे व्हाट्स अँप बोघायचे नाही, असे ते हिरड्या आपल्या ओठांनी चघळत चघळत म्हणाले!!
पण आजोबा हा पागे कोण तुमचा मित्र? कधी ऐकला नाही तो? मी विचारले!!
पाहिलासच का तो गृप? तुला काय करायचे आहे त्या विषयी? तो माझा मित्र मैत्रिणींचा खाजगी गृप आहे!!!
ते कळलं आजोबा पण पागे कोण?
अरे बावळटा! तो शॉर्ट फॉर्म आहे, आजोबा कवळी बसवीत बसवीत म्हणाले, विसपागे चा गृप म्हणजे, वीर्य संपलेल्यांचा आणि पाळी गेलेल्यांचा गृप आहे तो!!
समजले? आता माझा मोबाईल परत उघडत जाऊ नकोस!!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *